Advertisement

विसर्जनादरम्यान डीजे वाजवणाऱ्या २०२ मंडळावर गुन्हे दाखल

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे किंवा त्यासारख्या कर्कश्श आवाज करणाऱ्या वाद्यांचा वापर करणाऱ्या २०२ मंडळांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

विसर्जनादरम्यान डीजे वाजवणाऱ्या २०२ मंडळावर गुन्हे दाखल
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश डावलून गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे किंवा त्यासारख्या कर्कश्श आवाज करणाऱ्या वाद्यांचा वापर करणाऱ्या २०२ मंडळांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे सारख्या वाद्यांवर उच्च न्यायालयानं बंदी घालत आदेशाचं उल्लघंन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.


आवाज १०० डेसिबलच्याही पुढे

वाढतं ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ६५ ते ७० डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा नियम आहे. परंतु डीजे वा तत्सम वाद्यांचा आवाजाचं वाद्य वाजवण्यास सुरू करताच त्याचा किमान आवाज १०० डेसिबलपर्यंत जातो. यामुळं उच्च न्यायलयानं ६५ ते ७० डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं होतं.


गुन्हे दाखल

परंतु तरीही १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सवादरम्यान जवळपास २०२ मंडळांनी डीजे किंवा ध्वनीप्रदूषण करणारी वाद्य वाजवली. या सर्व मंडळांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. गणशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



हेही वाचा-

१० दिवसांच्या बाप्पांची संख्या २० टक्क्यांनी वाढली

लालबागच्या राजाचं २१ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा