Advertisement

मुंबई ते वापी हॅलिकॉप्टर प्रवास

खाजगी जेट सेवेच्या तुलनेत ही सेवा अधिक स्वस्त आहे. मुंबई ते वापी प्रवास करणाऱ्या व्यवसायिकांना यासाठी २१ हजार रुपये मोजावे लागतील.

मुंबई ते वापी हॅलिकॉप्टर प्रवास
SHARES

कामानिमित्त किंवा फिरायला म्हणून अनेक जण मुंबई ते वापी (गुजरात) प्रवास करतात. या मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई ते वापी आणि मुंबई ते तारापूर या मार्गांवर नुकतीच हॅलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता कमी वेळेत आणखी एक नवा पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे.


तिकिटाची किंमत किती?

या सेवेला 'स्कायशटल' हे नाव देण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये खाजगी चार्टर सेवा पुरवणारी कंपनी GetSetGo नं ही सेवा लाँच केली आहे. पाच जण बसू शकतील एवढी जागा यात आहे. सध्या तरी ही सेवा फक्त व्यवसायिकांनाच देण्यात आली आहे. खाजगी जेट सेवेच्या तुलनेत ही सेवा अधिक स्वस्त आहे. मुंबई ते वापी प्रवास करणाऱ्या व्यवसायिकांना यासाठी २१ हजार रुपये मोजावे लागतील. २१ हजारापासून तिकिटाच्या किंमती सुरू होतात. जुहूमधल्या पवन हंस विमानतळावरून दोन हॅलिकॉप्टर वापी आणि तारापूरसाठी उपलब्ध करून दिले आहेत.


मालदीव, थायलंडला जाणाऱ्यांसाठी खूशखबर!



वेळेची बचत

GetSetGo तर्फे मुंबई ते बंगळुरू ही खाजगी जेट सेवा आधीच सुरू केली आहे. ज्याची किंमत २१ हजार ९५० रुपये इतकी आहे. इतर देशांमध्ये लवकरच कंपनी ही सेवा सुरू करण्याच्या विचारात आहेसध्या त्यांनी मुंबई ते वापी आणि मुंबई ते तारापूर अशा दोन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा सर्वात अधिक फायदा व्यवसायिकांना आहे. कारण आवश्यक कामासाठी जायचं असल्यास हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खाजगी जेटच्या तुलनेत तिकिटाची किंमत कमी आहे. त्यामुळे पैशांची बचतदेखील होते. दुसरा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला बोर्डिंग पाससाठी आणि लगेजसाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. फक्त त्यांनी दिलेल्या ठराविक जागेवर तुम्ही पोहोचलात की प्रवास सुरू.



हेही वाचा

मुंबई टू गोवा करा अलिशान क्रूझनं सफर

शुल : देशातील पहिली इलेक्ट्रीक हायपर कार लाँच




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा